सोनिया गांधी यांच्या संपत्तीत मोठी वाठ, इतक्या रुपयांनी वाढली त्यांची संपत्ती
Created By: Shweta Walanj
सोनिया गांधी यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 72 लाख रुपयांची वाढ झाली आहे.
राजस्थान राज्यसभा उमेदवारी अर्जानुसार, सोनिया गांधी यांच्याकडे 12.53 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्याकडे 88 किलो चांदी, 1267 ग्रॉम सोनं आणि दागिने आहेत.
रिपोर्टनुसार, ईटली येथे देखील सोनिया गांधी यांची वडिलोपार्जित संपत्ती आहे. ज्याची किंमत 26 लाख रुपये आहे.
दिल्ली येथे सोनिया गांधी यांचे तीन बंगले आणि शेत जमीन देखील आहे. ज्याची किंमत 5.88 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
खासदार वेतनाशिवाय सोनिया गांधी रॉयल्टी इनकम, बँक व्याज आणि इतर मार्गांनी पैसे कमावतात.
रिपोर्टनुसार सोनिया गांधी यांच्याकडे स्वतःची कार नाही.
हे सुद्धा वाचा | सानिया मिर्झा हिच्याकडून करुन घ्यायचंय महत्त्वाचं काम? मोजावी लागेल इतकी रक्कम