कार्लोसने विम्बलडन जिंकून कमावले इतके कोटी, टी20 वर्ल्डकपपेक्षा जास्त मिळवले

14 July 2024

Created By:  Rakesh Thakur

कार्लोस अलकराजने विम्बलडन स्पर्धेच्या अंतिम फेरीत नोवाक जोकोविचला पराभूत केलं.

अंतिम सामन्यात जोकोविचने अलकराजला कडवी झुंज दिली. पण ट्रायब्रेकरमध्ये विजय मिळवण्यात कार्लोसला यश आलं. 

कार्लोस अलकराजने जोकोविचला 6-2,6-2,6-6(7-6) ने जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये जोकोविच कमबॅक करेल असं वाटत होतं. पण तसं झालं नाही. 

अलकराजने बॅक टू बॅक दोन ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यापूर्वी फ्रेंच ओपन स्पर्धा आपल्या नावावर केली होती. 

नोवाक जोकोविच विम्बलडन स्पर्धेत रोजर फेडररच्या रेकॉर्डची बरोबरी करण्यात अपयशी ठरला. फेडररने 8, तर जोकोविचने 7 किताब जिंकले. 

कार्लोसला या विजयासह मिळाल 27 लाख पाउंड म्हणजेच 28.64 कोटी रुपये मिळाले. टी20 वर्ल्डकप संघाला 20.42 कोटी मिळाले होते. 

नोवाक जोकोविच फायनल हरला असला तरी उपविजेतेपदासाठी त्याला 14.85 कोटी रुपये मिळाले.