खेळाडूकडून पत्नीला धोका, द्यावे लागले 3200 कोटी
7 जानेवारी 2025
क्रिकेटर युझवेंद्र चहल-धनश्री वर्मा दोघेही विभक्त होणार असल्याची चर्चा रंगलीय, घटस्फोटाचा विषय निघाल्यावर क्रीडा विश्वात टायगर वूड्सचं नाव येतंच
गोल्फपटू टायगर वूड्स आणि मॉडेल एलिन नॉर्डेग्रेन यांच्यात सर्वात महागडा घटस्फोट झाला होता, दोघेही 2010 मध्ये विभक्त
वूड्स-नॉर्डेग्रेन 2004 मध्ये विवाहबद्ध, 6 वर्षांनंतर विभक्त झाले
टायगर वूड्सने घटस्फोटानंतर तडजोड म्हणून 710 मिलियन यूएस डॉलर दिले, तेव्हा त्या रक्कमेचं मूल्य जवळपास 3200 कोटी रुपये इतकं
2009 साली वूड्सच्या सेक्स स्कँडलचा खुलासा, गोल्फपटूचं मॅनेजरसोबतच अफेअर असल्याचं उघड, त्यामुळे नॉर्डेग्रेनने विभक्त व्हायचं ठरवलं
टायगर वूड्स यांची गणना जगविख्यात गोल्फपटूंमध्ये होते
टायगर वूड्सने 100 पेक्षा अधिक महिलांसह संबंध ठेवले असल्याचं म्हटलं जातं, घटस्फोटानंतर वूड्सने जाहीर माफी मागितली होती