या भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा मिळवला मान, जाणून घ्या

21 July 2024

Created By: राकेश ठाकुर

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला 26 जुलैपासून सुरु होणार आहे. भारताकडून 117 स्पर्धकांनी भाग घेतला आहे

ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचं मेहनत घेणाऱ्या प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. काही खेळाडूंनी ही एक दोनपेक्षा जास्तवेळा मिळाली आहे.

भारताकडून लिएंडर पेसने सर्वाधिकवेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळवण्याचा मान मिळवला आहे. त्याने 7 स्पर्धांमध्ये भाग घेतला.

अभिनव बिंद्राने चार ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला. यात 2004, 2008, 2012 आणि 2016 चा समावेश आहे. यात एक गोल्ड मिळवलं.

पीटी उषाही चार वेळा स्पर्धेत खेळली आहे. यात 1980, 1984, 1988 आणि 1996 ऑलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. 

गगन नारंग यानेही चारवेळा स्पर्धेत भाग घेतला होता. यात 2004, 2008, 2012 आणि 2016 ऑलिम्पिक स्पर्धेत खेळला. 

सुशील कुमार तीन वेळा ऑलिम्पिक स्पर्धेत खेळला आहे. 2004, 2008 आणि 2012 स्पर्धेत भाग घेतला. यात दोन मेडल जिंकले आहेत.