पाकिस्तानातील विद्यार्थी भारतात कोणते शिक्षण घेण्यासाठी येतात?
24 April 2025
Created By: Namrata Patil
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणाव वाढला आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली आहेत. यात पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
भारत सरकारच्या या निर्णयामुळे पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला आहे.
पाकिस्तानातील जे विद्यार्थी व्हिसाद्वारे भारतात शिक्षण घेत आहे किंवा जे विद्यार्थी इच्छुक आहेत, त्या विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे.
पाकिस्तानातून बहुतांश विद्यार्थी हे व्यवस्थापन (मॅनेजमेंट), अभियांत्रिकी (इंजिनिअरींग) आणि वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी भारतात येतात.
यासाठी पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश घेण्यापूर्वी भारतासह पाकिस्तानातील सरकारची परवानगी घ्यावी लागते.
पाकिस्तानी विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात.
तसेच त्या विद्यार्थ्यांना भारतात शिक्षण घेण्यासाठी ते फी भरण्यास सक्षम आहेत की नाही, ते कुठे राहणार आहेत, याची सविस्तर माहिती पोलिसांना द्यावी लागते.
मात्र आता पहलगाम हल्ल्यानंतर विद्यार्थ्यांचा अभ्यास आणि त्यांचे भवितव्य दोन्हीही धोक्यात आले आहे.