अन्नामध्ये पपईचा समावेश केल्यास वजन झपाट्याने कमी होते.

पपईमध्ये असे अनेक पोषक घटक आढळतात, जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतात.

लठ्ठपणा कमी करण्यासाठी रोजच्या नाश्त्यामध्ये पपईचा समावेश करावा.

वजन कमी करण्यासाठी आहारात पपईचा रस समाविष्ट करा. पपईचा रस प्यायल्याने शरीरात जमा झालेली चरबी कमी होते.

दूध आणि पपई फायदेशीर ठरू शकते. यासाठी मिक्सरमध्ये दूध आणि पपई टाकून मिक्स करा.

वजन कमी करण्यासाठीही दही आणि पपई फायदेशीर मानली जाते.

दह्यामध्ये पपई आणि ड्रायफ्रुट्स मिसळा. यामुळे तुमचे पोटही भरेल आणि वजनही झपाट्याने कमी होईल.