अटलबिहारी वाजपेयी किती संपत्ती मागे ठेवून गेले? आज त्याची किंमत किती?
25 December 2023
Created By : Mahesh Pawar
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज जयंती आहे.
भाजप सरकार त्यांचा वाढदिवस 'सुशासन दिन' म्हणून साजरा करते.
ऑगस्ट 2018 मध्ये अटलबिहारी वाजपेयी यांचा मृत्यू झाला.
त्यावेळी त्यांनी किती संपत्ती मागे सोडली होती? आज त्याची किंमत काय आहे?
2004 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 58.99 लाख रुपये होती.
वाजपेयी यांच्या त्यावेळच्या संपत्तीची आजची किंमत मोजली तर ती सुमारे 2.11 कोटी रुपये असेल.
'सेलिब्रिटीनेटवर्थ डॉट कॉम'ने त्यांच्या मृत्यूवेळी ही संपत्ती 20 लाख डॉलर्स असल्याचे सांगितले होते.
आजच्या रुपयाच्या मूल्यानुसार ही रक्कम 16.63 कोटी रुपये इतकी होते.
वाजपेयी यांनी लग्न केले नाही. मात्र, त्यांनी नमिता ही मुलगी दत्तक घेतली होती
त्यांच्या मृत्यूनंतर दत्तक मुलगी या सर्व मालमत्तेची वारस झाली.
हे सुद्धा वाचा | आम्हाला कधी फोन करत नाही, यावर द्या ही उत्तरे, करा स्वतःची अलगद सुटका