15 जानेवारी 2025

टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधून सरफराज खानने हे पाच सिक्रेट केले लीक?

सरफराज खान पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्यावर टीम इंडियातील बातम्या लीक केल्याचा आरोप एका मिडिया रिपोर्टमध्ये केला आहे.

ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीनंतर ड्रेसिंग रुममध्ये बरंच काही घडलं होतं. यात खेळाडूंचं एकमेकांशी पटत नसल्याची बातमी लीक झाली होती. 

रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांच्यातील मतभेदही चव्हाट्यावर आले होते. पण बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्लाने या बातमीचं खंडन केलं होतं. 

मेलबर्न कसोटीत पराभवानंतर गंभीरने आक्रमक पवित्रा घेतल्याची बातमीही लीक झाली होती. तसेच दिग्गज खेळाडूंना सुनावलं होतं.

पहिल्या सामन्यात बुमराहने कर्णधारपद भूषवलं होतं. पण एका खेळाडूचा कर्णधारपदावर डोळा होता. अशीही बातमी समोर आली होती.

गौतम गंभीर मालिकेत चेतेश्वर पुजाराला घेऊ इच्छित होता. पण निवडकर्त्यांनी गंभीरचं ऐकलं नाही.

सरफराज खानला या मालिकेत एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने फार थोडाच सराव केला होता.