20 नोव्हेबर 2024
मनी प्लांट घरात लावताना अशी काळजी घ्या, अन्यथा फायद्यापेक्षा होईल नुकसान!
Created By: राकेश ठाकुर
वास्तुशास्त्रानुसार घरात मनी प्लांट लावणं शुभ मानलं गेलं आहे. यामुळे घरात आर्थिक संकट येत नाही, अशी मान्यता आहे.
मनी प्लांट असलेल्या घरात आनंदी वातावरण असतं. तसेच लोकांची आर्थिक स्थितीही चांगली राहते. सुख समृद्धी राहते.
घरात मनी प्लांट लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मनी प्लांट कोणाच्या तरी दारातून चोरी करून लावू नये.
सध्या चोरी करून लावलेलं मनी प्लांट फळतं अशी एक समज दृढ झाली आहे. पण तसं अजिबात नाही.
वास्तुशास्त्रानुसार, कोणाचं नुकसान करून लावलेलं मनी प्लांट कसं फळू शकतं. त्या मागचा हेतूच चुकीचा असल्याने फळत नाही.
चोरी करून मनी प्लांट घरात लावलं तर सकारात्मक ऐवजी नकारात्मक प्रभाव पडतो. त्यामुळे फायद्याऐवजी नुकसान होतं, असं वास्तुशास्त्र तज्ज्ञ सांगतात.
मनी प्लांट कायम नर्सरीतून विकत घेऊन लावावं. पैसे देऊन सकारात्मक भावनेने आपण घरी आणि ती शुभ ठरते.