16 नोव्हेबर 2024
फक्त 10 रुपयांची ही वस्तू तुमच्या घरातील वास्तुदोष दूर करेल!
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात घर बांधताना वास्तुशास्त्राचा विचार केला जातो. घरबांधणी व्यवस्थित झाली तर कुटुंबाची प्रगती होते, अशी मान्यता आहे.
वास्तुशास्त्राचे नियम पाळले नाही तर वास्तुदोष निर्माण होते. आर्थिक आणि आरोग्यविषयक अडचणींचा सामोरं जावं लागू शकतं.
वास्तुदोष दूर करण्यासाठी महागडे उपाय सांगितले जातात. पण असं करूनही वास्तुदोष दूर होत नाही.
वास्तुशास्त्रात तुरटीचे अनेक उपाय सांगितले गेले आहेत. तुरटीच्या वापरामुळे वास्तुदोष दूर होते असं सांगितलं जातं.
एका वाटीत तुरटी घ्या आणि ती बाथरुममध्ये ठेवा. यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते.
वास्तुशास्त्रानुसार, प्रगती आणि धनलाभासाठी काळ्या रंगाच्या कपड्यात तुरटी बांधून घराच्या किंवा दुकानाच्या मुख्य दारावर बांधणं शुभ असतं.
तुरटीचा तुकडा लाल रंगाच्या कपड्यात बांधून पर्स किंवा तिजोरीत ठेवल्यास आर्थिक अडचण दूर होते.