akshaya-tritiya (2)

अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मात साजरा केला जाणारा अतिशय पवित्र सण आहे.

29 एप्रिल 2025

Tv9-Marathi
akshaya-tritiya (3)

हिंदू धर्मात असलेल्या भविष्यपुराण, मत्सपुराण, पद्मपुराण, विष्णूधर्मोत्तर पुराण आणि स्कंदपुराणात अक्षय्य तृतीयेचा विशेष उल्लेख आढळतो.

akshaya-tritiya (6)

हिंदू पंचांगनुसार, वैशाख मासच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयेला अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. सर्व प्रकारच्या शुभ कार्यासाठी हा दिवस चांगला आहे. 

akshaya-tritiya (5)

ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयाच्या दिवशी सोने, चांदी किंवा इतर धातूंची खरेदी शुभ आणि लाभदायक असते. 

यंदा अक्षय्य तृतीयेला शुक्र आणि गुरु नक्षत्र मावळत आहे. यामुळे लग्नाचा मुहूर्त या दिवशी नाही. परंतु सोने, चांदी किंवा इतर धातूची खरेदी करु शकतात. 

अक्षय्य तृतीयाला लग्नासाठी शुभ काळ नाही. परंतु त्यानंतर मे महिन्यात 1, 2, 13, 14, 15, 16, 17, 18, 22, 23, 24, 25, 26, 27 आणि 30 तारीख लग्नासाठी चांगली आहे.  

भगवान विष्णू यांना वैशाख महिना विशेष प्रिय आहे. यामुळे अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची या दिवशी पूजा करण्यात येते. 

अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असला तरी, जर त्यादिवशी किंवा त्या दिवसापूर्वी गुरूचा किंवा शु्क्राचा अस्त झालेला असेल तर विवाहादी मंगल कार्ये करू नयेत असे काही ज्योतिष्यांचे मत आहे.