mother in law and Daughter in law Disputes

सासू-सुनेचं पटत नाही? हे उपाय करा, प्रेम वाढलंच समजा!

17 April 2025

Created By: Sanjay Patil

Tv9-Marathi

सासू-सुनेचं पटत नाही, हे असं चित्र जवळपास प्रत्येक घरात पाहायला मिळतं, छोट्या छोट्या गोष्टीवरुन खटके उडतात

मान्यतेनुसार, ज्या घरात सासु-सुनेचं घट्ट नातं असतं तिथे  वातावरण आनंदी असतं, मात्र असं फार कमीच घरात पाहायला मिळतं

ज्योतिष शास्त्रात, सासु -सुनेच्या नात्यात गोडवा येण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत

ज्योतिष शास्त्रानुसार, सासु-सुनेच्या नात्यात सुधारणेसाठी सूर्यादयाआधी झाडू मारावा, केर घराबाहेर टाकून द्यावा

स्वच्छतेनंतर अंघोळ करावी, त्यानंतर सुनेला पाण्यात गूळ टाकून द्यावं, ते पाणी सूर्य देवाला अर्पण करावं, असं केल्याने नात्यात गोडवा येतो

सासुसोबतचं नातं सुधारण्यासाठी मंगळवारी शिरा करावा आणि तो गरिबांमध्ये वाटावा

आपसात सारखे वाद होत असल्यास सुनेने सासुला लाल रंगाची साडी, बांगड्या, फुलं भेट द्यावीत

5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!