घराच्या मुख्य द्वाराजवळ चुकूनही या गोष्टी ठेवू नका, देवी लक्ष्मी होईल नाराज!
4 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
वास्तुशास्त्रात प्रत्येक गोष्टींचे काही ना काही नियम सांगितले गेले आहेत. काही चूक झाल्यास वास्तुदोष निर्माण होतो
वास्तुशास्त्रात घराच्या मुख्य दाराचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. कारण येथून सकारात्मक तसेच नकारात्मक उर्जेचा प्रवेश होत असतो.
मुख्य दार स्वच्छ आणि सुंदर दिसण्यासाठी काही गोष्टी ठेवल्या जातात. यापैकी काही गोष्टी शुभ असतात. तर गोष्टींमुळे नुकसान होऊ शकतं.
वास्तुशास्त्रानुसार कधीही घराच्या मुख्य दाराजवळ पादत्राणे काढून ठेवू नयेत. यामुळे देवी लक्ष्मी नाराज होते.
घराच्या मुख्य दाराजवळ सुकलेली फुलं किंवा रोप असल्यास नकारात्मक उर्जेचा संचार वाढतो. तसेच आर्थिक समस्या वाढते.
वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दारावर कधीच देवी लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावू नये. यामुळे घराची प्रगती खुंटते.
घराच्या मुख्य दाराजवळ कचऱ्याचा डबाही ठेवू नये. असं केल्यास नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो.