26  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

29  ऑक्टोबर 2024

Created By: राकेश ठाकुर

नरक चतुर्दशीला पूजा केल्याने स्वर्गात जागा मिळते का?

नरक चतुर्दशीला यमासाठी प्रदोष काळात दिवा  लावण्याची प्रथा आहे. यावर्षी नरक चतुर्दशी 30 ऑक्टोबरला आहे. 

नरक चतुर्दशाली नरक चौदस किंवा रुप चौदस असही म्हणतात. नरक निवारण चतुर्दशी असंही संबोधतात.

हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी पूजा विधी केल्याने व्यक्ती नरकाच्या भीतीपासून मुक्ती मिळते. 

या दिवशी यमाची पूजा करण्याची प्रथा आहे. असं केल्याने माणसाची पापं नष्ट होतात, अशी धार्मिक मान्यता आहे. 

नरक चतुर्दशीला भक्तीभावाने पूजा केल्यास स्वर्गप्राप्ती होते, अशी श्रद्धा आहे. 

नरक चतुर्दशीला संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ यमाच्या नावाने दिवा लावल्यास अकाली मृत्यूचे भय राहात नाही, असं सांगितलं जातं. 

नरक चतुर्दशीला नाल्याजवळ किंवा कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ दिवा लावल्यास व्यक्तीला नरक भोगावा लागत नाही, अशी मान्यता आहे.