देवघरातील देवाच्या मूर्ती किती मोठ्या असाव्यात? पूजेपूर्वी 'या' गोष्टी नक्की जाणून घ्या

16 December 2024

Created By: Mayuri Sarjerao

देवघर घेताना आपण नेहमी सर्व बाजूंनी विचार करतो. देवघर किती मोठं असाव, लाकडी असावं की नसावं याची काळजी घेतो.

पण देवघरातील देवाच्या मूर्ती किती मोठ्या असाव्या किंवा त्यांची नक्की साईज किती हवी याबाबत आपण फार काही विचार करत नाही

शास्त्रानुसार देवघरात जास्त मोठी मूर्ती ठेऊ नये असं म्हटलं जातं

मूर्ती ही 3 इंचापेक्षा जास्त मोठ्या आकाराची असू नये.

3 इंच म्हणजे अंगठ्यापेक्षा मोठ्या आकाराची मूर्ती देवघरात ठेऊ नये.

वास्तूनुसार, देवी-देवतांना जमिनीवर ठेऊ नये, मूर्ती नेहमी चौरंगावर किंवा पाटावर ठेवावी. तसेच देवघर नेहमी जमिनीपेक्षा थोडं उंचावर  असावं

देवघरात भंग पावलेल्या किंवा तुडलेल्या मूर्ती , फोटो ठेऊ नये अन्यथा वास्तू दोष लागतो असं म्हणतात

शास्त्रानुसार देवघरात शंख, घंटी, कवड्या, चंदन, तांब्याचा शिक्का, शालाग्राम, लहान शिवलिंग, गंगाजल ठेवला पाहिजे

वास्तू शास्त्रानुसार देवघर बनवताना ते जीन्यापासून, बाथरूमपासून लांब असावे

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)