23 डिसेंबर 2024

शनिची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते? जाणून घ्या

शनिदेवांचं नाव ऐकलं तरी अनेकांची भंबेरी उडते. कारण आयुष्यात केलेल्या चुकांसाठी न्यायदेवता चांगलाच दणका देतात. 

शनिची साडेसाती आणि अडीचकी व्यक्तीच्या आयुष्यात उलथापालथ करतात. चला जाणून घेऊयात शनिची साडेसाती आयुष्यात किती वेळा येते?

शनि साडेसाती आयुष्यात कमीत कमी दोन वेळा येते. कधी कधी ही साडेसाती तीन वेळा येऊ शकते. 

शनिची साडेसाती साडे सात वर्षे असते. शनि एका राशीत अडीच वर्षे राहतो. त्यामुळे पुन्हा एका राशीत येण्यासाठी 30 वर्षे लागतात. 

शनि साडेसातीचा प्रभाव तीन टप्प्यात असतो. पहिला, मधला आणि शेवटचा टप्पा असतो. हे तिन्ही अडीच वर्षांचे असतात.

तिसऱ्या अडीच वर्षानंतर शनि साडेसाती संपते. तिन्ही टप्प्यात जातकांना विविध अनुभूती येते. साडेसातीचा एखादा टप्पा त्रासदायक जातो.

आर्थिक अडचण, घरातील भांडणं यासारख्या अडचणींना सामोरं जावं लागतं. तसेच अपमार्गाने कोणतीच गोष्ट घेऊ नये त्याचा फटका बसतो.