13 नोव्हेबर 2024

कलियुगाचा शेवट होण्यासाठी आणखी किती वर्षांचा अवधी शिल्लक?

Created By: राकेश ठाकुर

धार्मिक ग्रंथांमध्ये कलियुगाबाबत वेगवेगळी माहिती आहे. धर्मग्रंथांमध्ये या युगाबाबत वेगवेगळे उल्लेख केले आहे. त्यात बरीच विवधता दिसते. 

धार्मिक ग्रंथ आणि पुराणानुसार संध्या कलियुग सुरु आहे. कलियुग हे (सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग) शेवटचं युग आहे.

कलियुगात अधर्म, हिंसा आणि लोभ वाढतो. ऋषी-मुनींच्या म्हणण्यांनुसार, जेव्हा या प्रकारच्या लक्षणाचा उच्चकोटीचा अतिरेक होईल तेव्हा कलियुग संपेल.

अनेक ग्रंथांमध्ये कल्कि अवताराबाबत सांगितलं आहे. कल्कि या युगाच्या शेवटी धर्म स्थापनेसाठी येईल. कल्की हा भगवान विष्णुंचा शेवटा अवतार असेल.

भारतीय धर्मग्रंथ आणि पुराणानुसार कलियुगाचा अजून 4,26,875 वर्षे शिल्लक आहेत. हिंदू धर्मानुसार कलियुग सुरु होईल 5125 वर्षे झाली आहेत. 

पुराणानुसार, श्रीकृष्णाच्या मृत्यूनंतर द्वापरयुगाचा शेवट झाला. महाभारतानुसार, कलियुगाची सुरुवात जवळपास 5 हजार वर्षांपूर्वी झाली आहे.

कलियुगाचा अंत 4 लाख 32 हजार वर्षाच्या शेवटी होईल. तेव्हा पृथ्वीवर महाप्रलय येईल. यानंतर सतयुगाचा प्रारंभ होईल.