11 नोव्हेबर 2024

देवासमोर किती वेळ ठेवावा नैवेद्य? काय आहे नियम?

Created By: राकेश ठाकुर

हिंदू धर्मात पूजाविधी पार पडल्यानंतर नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. 

धार्मिक मान्यतेनुसार, देवी देवतांसमोर भोग आणि नैवेद्य दाखवण्याचे नियम आहेत.

अनेकदा भक्तगण देवांना भोग किंवा नैवेद्य दाखवल्यानंतर तिथेच सोडून देतात. चला जाणून घेऊयात यासाठी काय नियम आहे.

तुम्हीही देवाला नैवेद्य दाखवत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.

देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर पाच मिनिटातचं तो उचलून लोकांमध्ये वाटला पाहीजे. म्हणजेच नैवेद्य दाखवण्याचा अवधी पाच मिनिटांचा असतो. 

धार्मिक मान्यतेनुसार, जास्त वेळ नैवेद्य किंवा भोग ठेवल्यास नकारात्मक उर्जेचा वास होतो. त्यामुळे असा नैवेद्य लोकांना वाटू नये.

धार्मिक शास्त्रानुसार, देवांना ताजा नैवेद्य दाखवला पाहीजे. तसेच जवळ पाणीही ठेवणं आवश्यक आहे. नैवेद्य चांदी, तांबं किंवा मातीच्या ताटात दाखवला पाहीजे.