वास्तुशास्त्रानुसार, घराचा आपल्या जीवनावर प्रभाव पडतो. वास्तुदोष असल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. धन, आरोग्य आणि कौटुंबिक पातळीवर अडचणी येऊ शकतात.
वास्तुशास्त्रानुसार, घरात कोणतीही तोडफोड न करता त्यात सुधारणा केली जाऊशकते. सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढवू शकता.
उत्तरपूर्व दिशा जलतत्त्वाचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे ही जागा कायम स्वच्छ ठेवावी. या ठिकाणी फिशटँक ठेवणं शुभ मानलं जातं.
वास्तुशास्त्रानुसार, मुख्यद्वार हे घराचं मुख असतं. इथे कायम स्वच्छता ठेवावी. हा परिसरात अडगळ करू नये.
वास्तुशास्त्रानुसार, विविध रंगांचा आपल्या मनावर प्रभाव पडतो. उत्तर पूरव दिशेला पांढरा, लाईट पिवळा किंवा हिरवा रंग लावावा.
घराजवळ काही झाडं लावल्याने सकारात्मक उर्जेच संचार होतो. मनी प्लांट आणि तुळस लावावी.
वास्तुशास्त्रानुसार, पिरामिड नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचं काम करतात. तसेच फेंगशुई यंत्रही सकारात्मक उर्जाला प्रभाव वाढवतात. ही यंत्र घरात वेगवेगळ्या कोपऱ्यात ठेवावी.