18 नोव्हेबर 2024
तेवत असलेला दिवा विझवला की पुढच्या जन्मात मिळते अशी शिक्षा!
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात दिव्याला पंचतत्त्वाचं प्रतिक मानलं गेलं आहे. पूजाविधी दरम्यान दिवा लावण्याची परंपरा आहे.
तेवत असलेला दिवा विझवण्याचं अनेकांच्या मनात येतं. जर तसं केलं तर काय होईल, असा प्रश्न पडतो.
हिंदू धर्मातील 18 पुराणातील एका भविष्य पुराणात दिवा विझवण्याबाबत मिळणाऱ्या शिक्षेचा उल्लेख केला आहे.
भविष्य पुराणानुसार, जर एखाद्या व्यक्तीने तेवत असलेला दिवा विझवला तर पुढील जन्मात डोळ्यांचा त्रास होतो.
हिंदू धर्मात दिवा विझवणे अशुभ मानले जाते. त्यामुळे देवापुढे तेवत असलेला दिवा विझवू नये.
इतकंच काय तर दिव्याची चोरी करणाऱ्याला पुढील जन्मात अंधत्वाची शिक्षा भोगावी लागते, असाही भविष्य पुराणात उल्लेख आहे.
दिवा तेवत असेल तर त्याला तेल संपेपर्यंत तसंच राहू द्यावं. त्याला कधीही फुंकर मारून विझवू नये असं हिंदू शास्त्र सांगतं.