11 जानेवारी 2025

दक्षिण दिशेला या पाच वस्तू ठेवल्या असतील तर लगेच काढा, नाही तर...

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशा ही यम आणि पितरांची दिशा आहे. यामुळे या ठिकाणी काही गोष्टी ठेवणं अशुभ मानलं जातं.

वास्तुशास्त्रात या दिशेला काय ठेवावं आणि काय नको हे सांगितलं गेलं आहे. चला जाणून घेऊयात

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला चपला आणि बूट ठेवू नयेत. यामुळे पितृदोषाचा सामना करावा लागतो. 

वास्तुशास्त्रानुसार दक्षिण दिशेला दिवा लावू नये. यामुळे घरात आर्थिक अडचण येते. पण पितृपक्षात लावू शकता.

दक्षिण दिशेला तुळशी वृंदावन नसावं. यामुळेही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये. यामुळे अनेक अडचणी उभ्या राहतात. 

दक्षिण दिशेला जेड प्लांट, फिनिक्स बर्ड, हनुमंतांचा फोटो आणि सोने चांदी ठेवणं शुभ मानलं जातं.