तुळशीची पाने चावून खाणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या
22 मार्च 2025
Created By : मयुरी सर्जेराव
हिंदू धर्मात तुळशीला पवित्र मानले जाते आणि आयुर्वेदात ती औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण म्हटलं जातं. अनेक आजारांवर तुळस फायदेशीर असते
तुळशीची पाने चावून खाणे योग्य की अयोग्य? तर याचे उत्तर आहे नाही. तुळशीची पाने चावून खाऊ नयेत. याची वैद्यकीय आणि धार्मिक कारणे आहेत.
तुळशीमध्ये पारा आणि लोह असते. जर ते चावून खाल्ले तर ते दातांना नुकसान पोहोचवू शकते. ते चघळल्याने दातांच्या इनॅमलवर परिणाम होऊ शकतो आणि हळूहळू दात कमकुवत होऊ शकतात.
तुळशीची पाने नैसर्गिकरित्या किंचित आम्लयुक्त असतात. जर तुम्ही ते चघळले तर त्याच्यातील आम्लाचा दातांवर परिणाम होऊ शकतो
तुळशीला देवी मानलं जातं. हिंदू धर्मात, तुळस पूजनीय मानली जाते आणि ती भगवान विष्णूला समर्पित केली जाते. धार्मिक श्रद्धेनुसार, तुळशीची पाने चावणे हा तिचा अनादर मानला जातो.
हिंदू धर्मात असे मानले जाते की भगवान विष्णू तुळशीमध्ये वास करतात.त्यामुळे तिचे पाने चावून खाणे धार्मिकदृष्ट्या अयोग्य मानले जाते.
तुळशीची पाने धुवून न चावता थेट गिळू शकता. किंवा तुळशीची पाने पाण्यात उकळा, त्याचा काढा बनवा आणि तो प्या. याशिवाय, तुम्ही त्याची पावडर मध किंवा गरम पाण्यात मिसळून घेऊ शकता.
( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)