प्रेमानंद महाराज प्रसिद्ध संत आहे. त्यांच्या व्हिडिओची सोशल मीडियावर नेहमी चर्चा होत असते.
26 March 2025
Created By : Jitendra Zavar
प्रेमानंद महाराज राधा राणीचे अनन्य भक्त आहेत. ते आपल्या प्रवचनातून भक्तांना भक्ती अन् अध्यात्मचा मार्ग दाखवत असतात.
प्रेमानंद महाराज यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात ते भक्तांना सांगतात, कठीण काळात भगवंतांचे नाव घेणे स्वार्थ आहे की नाही.
प्रेमानंद महाराज म्हणतात, जेव्हा आपल्या जीवनात सुख असेल तेव्हा त्याला भगवानची दया समजली पाहिजे. दु:ख असेल त्याला भगवंतांची कृपी समजली पाहिजे.
सुख अन् दु:ख हे आपल्या आपल्या मागील कर्माचे फळ असते, असे प्रेमानंद महाराज सांगतात.
प्रेमानंद महाराज म्हणतात, आम्हाला सदैव भगवंतांचे भजन केले पाहिजे. केवळ कठीण काळात भगवंतांचे नामस्मरण करणे, असे घडू नये.
आपला भगवंतांशी किती संबंध आहे, हे आपले ह्रदयला माहीत असते. त्यामुळे ह्रदयाने भगवंतांची आठवण केली पाहिजे.
ईश्वराचे स्मरण हे जीवनाचे सार आहे. प्रत्येक परिस्थितीत भगवंतांचे स्मरण केले पाहिजे. अशा व्यक्ती जीवनातील सुख अन् दु:ख सहज स्वीकारतो, असे प्रेमानंद महाराज म्हणतात.
आम्ही जेव्हा अडचणीत असतो तेव्हा आपली कोणी मदत करत नाही. त्यावेळी माता-पिता यांच्याशिवाय भगवंतच आपल्यासाठी एकमेव आधार असतात.