19 नोव्हेबर 2024

घरात या ठिकाणी रोज दिवा लावा, आर्थिक संकट दूर होईल!

Created By: राकेश ठाकुर

वास्तुशास्त्रात दिवा रोज घरात लावणं शुभ मानलं गेलं आहे. घरात रोज दिवा लावल्याने सुख समृद्धी येते. 

वास्तुशास्त्रानुसार, घरात रोज दिवा लावल्याने घरातील आर्थिक सुबत्ता टिकून राहते. तसेच सकारात्मक ऊर्जा राहते.

तुम्ही आर्थिक संकटात असाल तर वास्तुशास्त्रात या ठिकाणी दिवा लावण्याचा सल्ला दिला गेला आहे.

वास्तुशास्त्रानुसार, घराचा उंबरठा व्यवस्थित स्वच्छ करावा आणि त्याच्या बाजूला दररोज दिवा लावावा.

वास्तुशास्त्रानुसार, असं रोज सकाळ संध्याकाळ केल्यास फायदा होतो. तसेच आर्थिक संकट दूर होण्यास मदत होते.

वास्तुशास्त्रानुसार, कोणत्याही घराच्या उंबरठ्याशेजारी दिवा लावला असेल तर देवी लक्ष्मी घरात वास करते. 

देवी लक्ष्मीच्या कृपेने घरातील आर्थिक संकट दूर होतं. तसेच घरात पैशांचा ओघ सुरु राहतो.