8 जानेवारी 2025
Mahakumbh 2025 : कुंभमेळ्यात होणारे राक्षस स्नान म्हणजे काय?
प्रयागराजमध्ये 13 जानेवारीपासून महाकुंभमेळ्यास सुरुवात होणार आहे. हा जगातील सर्वात मोठा उत्सव आहे. हा महाकुंभ 26 जानेवारीपर्यंत असणार आहे.
महाकुंभात शाही स्नानासाठी 6 तिथी आहेत. या तिथीवर स्नान केल्यानंतर पापमुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. तसेच मोक्षप्राप्ती होते.
कुंभमेळ्यात मुनि, देव, मानव आणि राक्षस स्नान असे प्रकार असतात. राक्षस स्नान म्हणजे काय ते समजून घेऊयात.
राक्षस स्नान सर्वात नित्कृष्ट मानलं जातं. हे स्नान सकाळी 8 नंतर केलं जातं. या वेळेला राक्षस स्नान म्हंटलं जातं.
मुनी स्नान सकाळी 4 ते 5, देव स्नान सकाळी 5 ते 6 आणि मानव स्नान 6 ते 8 असतं.
स्नानामुळे शरीरातील अशुद्धी दूर होते. तसेच व्यक्तिला मानसिक शांती मिळते, अशी मान्यता आहे.
गंगा आणि त्रिवेणी संगमात स्नान केल्यास पापमुक्ती होते. तसेच पुण्य फळ मिळतं असं शास्त्र सांगतं.