प्रसिद्ध कथावाचक व मोटीव्हेशनल स्पीकर जया किशोरी आपले प्रेरणादायक विचार आणि प्रवचनासाठी प्रसिद्ध आहे. 

7 April 2025

Created By : Jitendra Zavar

जया किशोरी यांच्या मोटीव्हेशनल विचाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नुकतेच त्यांनी एका प्रवचनातून मुलासंदर्भात काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. 

जया किशोरी मुलांच्या संगोपणाबाबत बोलताना म्हणतात, मुले कच्ची मातीप्रमाणे असतात. त्यांना योग्य आकार देणे गरजेचे आहे. 

जया किशोरी म्हणतात, कोणत्याही परिस्थितीत मुलांसमोर चार गोष्टी करु नका. त्याबाबत काय लक्ष ठेवा.

मुले बोबडे बोलतानाही कोणाबाबत अपशब्द बोलत असतील तर त्यावर हसू नका. त्याकडे दुर्लक्षही करु नका. मुलांना असे न करण्याची समजूत द्या.

मुलांसमोर तुम्ही कोणासंदर्भात अपशब्द बोलू नका आणि मुलांनाही बोलू देऊ नका, असे जया किशोरी यांनी म्हटले आहे. 

तुम्ही जसे वागाल मुलेही तसेच बनतील. यामुळे मुले तुम्हाला जसे हवे असतील तसेच तुम्हीसुद्धा वागा.

मुलांसमोर आई-वडिलांनी कधीही भांडण करु नका. त्यामुळे मुले तुम्हाला गंभीरतेने घेत नाही.