31  डिसेंबर 2024

नववर्षात तुळशीला बांधा अशी वस्तू, कधीच पैशांची चणचण भासणार नाही!

हिंदू धर्मात तूळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. ज्या घरात तूळस तिथे लक्ष्मीचा वास असतो. 

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाला काही गोष्टी बांधणं शुभ मानलं जातं. 

आर्थिक संकटात अडकला असाल तर ही वस्तू तुळशीच्या रोपाला बांधल्याने फायदा होतो, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. 

नवीन वर्षात आर्थिक लाभ मिळवण्यासाठी विधीवत पूजा करून तुळशीला लाल धागा बांधावा. 

तुळशीला लाल धागा बांधल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते. तसेच पैसा आकर्षित करतो. हा विधी शुक्रवारी करावा. 

तुळशीला पिवळा धागा बांधणंही शुभ मानलं जातं. धाग्याला 108 गाठी मारून तुळशीला बांधावं. यामुळे आर्थिक संकट दूर होते. 

शु्क्रवारी तुळशीला हळदीची गाठ बांधावी. 11 शुक्रवारनंतर गाठ बदला.