17 मार्च 2025
घरात सुख शांती नांदावी यासाठी हवन करण्याचा नियम काय? जाणून घ्या
घरात पूजाविधी करताना आरती आणि हवन केलं जातं. यामुळे घरात सुख शांती येते अशी मान्यता आहे.
पण हवन करताना चुकीचं काही केलं तर देव नाराज होऊ शकतात. त्यामुळे हवन करताना काळजी घेणं गरजेचं आहे.
हवनात आहुति देताना अनामिकेत कुश किंवा आंब्याचं पान घालणं गरजेचं आहे. जर या वस्तू नसतील तर सोन्याची अंगठी घालावी.
हवन सामग्री फक्त सोनं, चांदी, कांस्य, पितल आणि पानांमध्ये ठेवूनच आहुती दिली पाहीजे. स्टील किंवा लोखंडाच्या भांड्याचा वापर करू नये.
हवनकुंड हे लोह किंवा धातूचं नसावं. ते माती किंवा विटांपासून केलेलं असावं. याचा वापर हवनविधीसाठी करावा.
आसनावर बसून हवन करत असताना पाय हलवू नये. असं केल्यास हवनाचं पुण्य फळ मिळत नाही.
हवनात आहुती देताना कायम कनिष्ठा, अनामिका, मध्यमा आणि अंगठ्याचा वापर करावा. तर्जनीचा वापर करू नये.