मुलांना वाईट नजर लागल्याची लक्षणं कोणती?
20 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात प्राचीन काळापासून अनेक परंपरा आणि श्रद्धा चालत आल्या आहेत. मुलांना वाईट नजर लागते यापैकी एक समजूत आहे.
वाईट नजर लागणे म्हणजे आजार नाही. पण यामुळे लहान मुलं चिडचिडी होतात आणि व्यवस्थित खात वगैरे नाहीत, अशी समज आहे.
हिंदू मान्यतेनुसार, मुलं नाजूक असतात आणि त्यांच्यावर वाईट नजर सहज पडते. चला जाणून घेऊयात वाईट नजरेची लक्षणं
मुलं वारंवार आजारी किंवा चिडचिडी होत असतील तर त्यांना वाईट नजर लागल्याचं लक्षण आहे.
मूल काही कारणाशिवाय वारंवार रडत असेल. त्याला नेमकं काय झालं हे कळत नसेल, अशावेळी त्याच्यावरून नजर काढली जाते.
जर मुलाला अचानक उलट्या होऊ लागल्या किंवा जुलाब झाला तर हे वाईट नजरेचे लक्षण मानले जाते.
मुलाच्या डोळ्याचा रंग बदलणं हे देखील वाईट नजरेचं लक्षण आहे. असं काही आढळलं तर अनेक घरात नजर काढली जाते.
मंदिरात 3 नारळ फोडल्याने काय फळ मिळतं? जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा