1 जानेवारी 2025
दक्षिण दिशेला घड्याळ असेल तर काय होतं?
आपल्या गरजेनुसार लोकं घरात कुठेही घड्याळ लावतात. पण अनेकदा त्याचे अशुभ परिणामही भोगावे लागू शकतात.
वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ लावू नये. जाणून घेऊयात दक्षिण दिशेला घड्याळ लावल्याने काय होतं?
वास्तुशास्त्रानुसार, दक्षिण दिशा ही यमराजाची दिशा मानली जाते. यमराज हे मृत्यू देवता आहेत.
त्यामुळे दक्षिण दिशेला घड्याळ लावणं अशुभ मानलं जातं. दक्षिण दिशेला घड्याळ लावल्यास त्याचा नकारात्मक प्रभाव पडतो.
दक्षिण दिशेला घड्याळ असल्यास वाईट काळ सुरु होतो. घरात हळूहळू आर्थिक संकट येतं. पैसा घरात थांबत नाही.
दक्षिण दिशेला घड्याळ असेल तर प्रगतीत अडथळे येतात. घरातील मुख्य व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.
घरात घड्याळ लावण्यासाठी पूर्व, उत्तर किंवा पश्चिम दिशा योग्य ठरते. पूर्व आणि उत्तर दिशा घड्याळ लावण्यासाठी शुभ मानली जाते.