21 डिसेंबर 2024
उशीखाली तुरटी ठेवून झोपलं तर काय होतं? जाणून घ्या वास्तुशास्त्र
वास्तुशास्त्रात तुरटीचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. लाल किताबमध्येही तुरटीचे काही उपाय सांगितले गेले आहेत.
तुरटी उशीच्या खाली ठेवल्यास लाभदायक ठरतं. जाणून घेऊयात तुरटी उशीखाली ठेवल्याने काय होते?
वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार तुरटी उशीखाली ठेवल्याने वाईट स्वप्न पडत नाहीत. तसेच भीती वाटत नाही.
झोपण्यापूर्वी तुरटी काळ्या फडक्यात बांधून उशीखाली ठेवल्यास मानसिक तणाव दूर होतो. तसेच सकारात्मक ऊर्जा मिळते.
तुरटी उशीखाली ठेवल्यानंतर पैशांची अडचण दूर होते. तसेच आर्थिक मार्ग खुले होतात.
तुरटी उशीखाली ठेवल्याने नजरबाधेतून सुटका होते. हा तुकडा सकाळी डोक्यावरून 7 वेळा फिरवून फेकून द्या.
घरात भांडणं होत असतील तर तुरटीचा तुकडा उशीखाली ठेवून झोपा. यामुळे क्लेश संपून जाईल आणि प्रगतीची दारं खुली होतील.
घरातील कोपऱ्यांमध्ये आणि मुख्य दाराजवळ तुरटी ठेवणं शुभ मानलं जातं. यामुळे वाईट शक्ति जवळ येत नाहीत.