सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने काय होतं? जाणून घ्या
11 April 2025
Created By: Sanjay Patil
हिंदू धर्मात झाडूला लक्ष्मीचं प्रतिक समजलं जात, त्यामुळे झाडूच्या वापराबाबत आणि काही नियम आहेत
अनेक जण रात्री झाडू मारतात, वास्तूशास्त्रानुसार सूर्यास्तानंतर झाडू मारल्याने काय होतं? हे जाणून घेऊयात
वास्तूशास्त्रानुसार, सूर्यास्तानंतर संध्याकाळी झाडू मारु नये, असं करणं धार्मिक दृष्ट्या अशुभ मानलं जातं
मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर झाडू मारल्यास घरात लक्ष्मी देवीचा वास राहत नाहीत, ज्यामुळे आर्थिक चणचण भासू शकते
मान्यतेनुसार, संध्याकाळी झाडू मारल्यास लक्ष्मी नाराज होते, ज्यामुळे व्यक्ती कर्जबाजारी होऊ शकतो
मान्यतेनुसार, संध्याकाळी झाडू मारल्यास घरावर अनेक संकट येऊ शकतात, अडचणींचा सामना करावा लागू शकतो
रात्री झाडू मारल्यास घरात नकारात्मक उर्जेचा वास राहतो, ज्यामुळे कुटुंबात कलह होऊ शकतो
वरील माहिती ही धार्मिक मान्यतेनुसार आहे. टीव्ही 9 मराठी याची पुष्टी करत नाही