वास्तुशास्त्रानुसार झाडू कधीही बेडच्या खाली ठेवू नये. असं करणं अशुभ असतं आणि अनेक अडचणींना आमंत्रण असतं.
हिंदू धर्मशास्त्रानुसार, झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे झाडू चुकीच्या पद्धतीने ठेवणं अशुभ मानलं जातं.
झाडूचा वापर स्वच्छता आणि नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी केला जातो. तसेच नकारात्मक उर्जा आपल्यात सामावून घेते. त्यामुळे झाडू बेडखाली ठेवल्यास नकारात्मक उर्जेचा संचार होतो.
बेडखाली झाडू ठेवल्याने आरोग्यविषयक तक्रारी डोकं वर काढतात. तसेच घरातील व्यक्ती वारंवार आजारी पडतात.
घरात वादविवाद होतात. तसेच कौटुंबिक शांतता भंग पावते. पती-पत्नीमध्ये वाद होतात.
झाडू योग्य ठिकाणी व्यवस्थितरित्या ठेवली पाहीजे.
अन्यथा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.
झाडू कायम स्वच्छ ठिकाणी ठेवावी. दरवाज्यासमोर किंवा पूजास्थळी ठेवू नये.