31  डिसेंबर 2024

सूर्यदेवांना हळद मिश्रित अर्घ्य दिल्यावर काय होतं? जाणून घ्या

हिंदू धर्मशास्त्रात सूर्यदेवांना अर्घ्य देण्याची मान्यता आहे. सूर्यदेवांना अर्घ्य दिल्याने घरात सुख समृद्धी येते.

अनेक भाविक सूर्यदेवाला हळद मिश्रित जल अर्पण करतात. चला जाणून घेऊयात असं केल्याने काय होतं?

हिंदू धर्मात हळद खूप शुभ मानली जाते. त्यामुळे सूर्याला हळद मिश्रित जल अर्पण केल्याने कुंडलीतील सूर्य मजबूत होतो. 

सूर्यदेवांना हळद मिश्रित पाणी वाहिलं की, अडकलेली कामं पूर्ण होतात. तसेच प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं.

सूर्याला हळद मिश्रित अर्घ्य दिलं की लग्न लगेच जमतं असं ज्योतिषशास्त्र सांगतं. विवाहात येणाऱ्या अडचणीही दूर होतात.

आर्थिक अडचणही दूर होते. तसेच आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होते. 

सूर्यदेव नेतृत्वाचा कारक आहे. सूर्यदेवाच्या कृपाने नेतृत्व करण्याची संधी मिळते आणि यशही मिळते.