16 जानेवारी 2025

घरात रबर प्लांट लावल्याने काय होतं? जाणून घ्या वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात काही झाडांचं खूप महत्त्व आहे. वास्तुदोष दूर करण्यासाठी या झाडांचा वापर केला जातो. 

लोकं घरात रबर प्लांट हवा शुद्ध करण्यासाठी आणि सजावटीसाठी लावतात. पण अनेकदा याचे फायदे लोकांना माहिती नसतात. 

रबर प्लांट घरात लावणं शुभ मानलं जातं. रबर प्लांट नकारात्मक ऊर्जा आणि वास्तुदोष दूर करतं.

रबर प्लांटमुळे आर्थिक अडचणीतून सुटका होते. तसेच घरात सुख समृद्धी येते. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते.

वास्तुशास्त्रानुसार रबर प्लांट घरच्या दक्षिण पूर्व दिशेस ठेवावं. या दिशेला रबर प्लांट असेल तर सकारात्मक उर्जेचा संचार होतो. 

रबर प्लांट अशा ठिकाणी ठेवावा जेथे पुरेसा प्रकाश असेल आणि थेट सूर्यप्रकाशापासून संरक्षित केले पाहिजे.