घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाल लावल्याने काय होतं?
11 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
घराच्या मुख्य दारावर घोड्याची नाल लावण्याची एक प्रथा पडली आहे. वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार यामुळे शुभ फळ मिळतं.
वास्तुशास्त्रानुसार, घोड्याची नाल लावल्याने वाईट नजर आणि नकारात्मक उर्जेपासून संरक्षण मिळतं. एक सुरक्षा कवच म्हणून काम करते.
घोड्याची नाल सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. मुख्य दरवाजावर लावल्याने सुख समृद्धी आणि आनंदी वातावरण राहतं.
ज्योतिषशास्त्रानुसार, काळ्या घोड्याची नाल शनिचा दुष्प्रभाव कमी करते. तसेच धन आणि समृद्धी आकर्षित करते आणि आर्थिक स्थिरता आणते.
घोड्याची नाल मुख्य दरवाजावर लावल्याने सकारात्मक उर्जेचा प्रवाह होतो. यामुळे घरात प्रेम आणि आनंदी वातावरण राहतं.
वास्तुशास्त्रानुसार, मुख्य दरवाजावर 'U' आकारात लावल्याने शुभ मानलं जातं. तसेच खालच्या बाजूने लावल्यास नशिबाची साथ मिळते.
घोड्याची नाल शुभ असते आणि काळ्या घोड्याची असेल तर अधिक शुभ मानली जाते. शनिवारी मुख्य दरवाजावर लावल्यास शुभ मानलं जाते.