मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधल्याने काय होते?

मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधल्याने काय होते?

28 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi

हिंदू धर्मात हळदीला खूप पवित्र मानले जाते. हळदीचा वापर अनेक पवित्र कामांमध्ये केला जातो.

काही लोक मुख्य प्रवेशद्वारावर हळदीची (ओली हळद किंवा हळकूंड)  गाठ बांधतात. त्यामुळे काय होते ते जाणून घेऊया

मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधल्याने घरात आनंद, संपत्ती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते

मुख्य दरवाजावर हळदीची गाठ बांधल्याने सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होते

मुख्य दारावर हळदीची गाठ बांधल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि ती घरात वास करते

हळद मुख्य दारावर बांधल्याने प्रगतीचा मार्ग मोकळा होतो, घराचे वाईट नजरेपासून रक्षण होते

हळदीची गाठ पिवळ्या कापडात बांधावी.नंतर ती पोटली घराच्या मुख्य दरवाजाच्या आतील बाजूस लावावी

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)