अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करण्याचं बजेट नसेल तर काय...
13 एप्रिल 2025
Created By: राकेश ठाकुर
हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा शुभ दिवस मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार, या दिवशी सोनं खरेदी केल्याने देवी लक्ष्मीची कृपा होते.
जर तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सोनं खरेदी करू शकत नसाल तर या गोष्टी खरेदी करू शकता. यामुळे तुम्हाला पूर्ण फळ मिळू शकते.
अक्षय तृतीयेला सोन्याच्या जागी काय खरेदी कराल आणि त्यामुळे तुम्हाला पूर्ण फळ मिळेल? ते जाणून घ्या
चांदीचं नाणं देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. अक्षय तृतीयेला सोन्याच्या जागी चांदीचा नाणं खरेदी करू शकता. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा होईल.
अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी जवस खरेदी करू शकता. देवी लक्ष्मीला अर्पण केल्याने आर्थिक संकटातून दिलाला मिळेल.
अक्षय तृतीयेला सोन्याऐवजी तुम्ही पितळ किंवा कांस्याची भांडी खरेदी करू शकता. या दिवशी या धातुची भांडी खरेदी करणं शुभ मानलं जातं.
कवडी देवी लक्ष्मीचं प्रतीक आहे. या दिवशी कवडी घेणं शुभ मानलं जातं. यामुळे पैशांचा चणचण भासत नाही.
धणेही धन आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. या दिवशी धणे खरेदी केल्याने आर्थिक सुधारणा होते.
अक्षय तृतीयेला सैंधव मीठ खरेदी करणंही शुभ मानलं जातं. मान्यतेनुसार या दिवशी सैंधव मीठ खरेदी केल्याने आर्थिक समृद्धी होते.