स्टीव्ह जॉब्सच्या पत्नीचं गोत्र काय? कुंभमेळ्यात मिळालं उत्तर
अॅपल कंपनीचे फाउंडर असलेल्या स्टीव्ह जॉब्सची पत्नी लॉरेन पॉवेलला सनातन धर्माबाबत प्रचंड आस्था आहे. स्टीव्ह जॉब्स या जगाचा निरोप घेतला आहे पण त्यांची पत्नी कुंभमेळ्यात हजेरी लावली.
महाकुंभमेळ्यात लॉरेन पॉवेल यांनी साधूसंतासारखी वेशभूषा केली आहे. त्यांनी सनातन धर्म आत्मसात केला आहे.
लॉरेन पॉवेल यांचं धर्मपरिवर्तन त्यांचे सनातनी गुरु निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडळेश्वर स्वामी कैलाशानंद गिरीजींनी केलं.
स्वामी कैलाशानंद गिरी यांनी लॉरेन यांना सनातनी केलं आणि त्यांना गोत्रही दिलं. त्यांच्यामते लॉरेन पॉवेल यांचं नाव कमला असेल आणि गोत्र 'अच्युत' असणार आहे.
महाकुंभ मेळाव्याचं औचित्य साधत लॉरेन पॉवेल प्रयागराजमध्ये राहणार आहे. येथे लॉरेन 15 दिवस म्हणजेच 29 जानेवारीपर्यंत राहणार आहेत.
लॉरेन भारतात आल्यानंतर वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिरातही गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी गुलाबी सूट आणि पांढरा दुपट्टा घेतला होता.