तुळशीला लाल रंगाचा धागा बांधल्याने काय फळ मिळते?

तुळशीला लाल रंगाचा धागा बांधल्याने काय फळ मिळते?

20 April 2025

Created By: मयुरी सर्जेराव

Tv9-Marathi

तुळशीला लाल रंगाचा धागा (कलावा) बांधणे ही हिंदू धर्मातील एक महत्त्वाची प्रथा.

हिंदू धर्मात तुळशीचे रोप पवित्र आणि शुभ मानले जाते. 

तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते. तुळशीला लाल धागा बांधल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात धन आणि समृद्धी राहते

तुळशीला लाल धागा बांधल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो.

असे मानले जाते की लाल धागा घराचे नकारात्मक शक्ती आणि वाईट नजरेपासून रक्षण करते.

काही मान्यतेनुसार, तुळशीच्या झाडाच्या तळाशी लाल धागा बांधल्याने आर्थिक समस्यांपासून मुक्तता मिळते

तुळस भगवान विष्णूंनाही प्रिय आहे. म्हणून,लाल धागा बांधल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद देखील मिळतो.

( डिस्क्लेमर : माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही दावा करत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)