26 नोव्हेबर 2024
कावळ्याचं घरी येणं कसले संकेत? वास्तुशास्त्र काय सांगतं? जाणून घ्या
घराच्या खिडकीवर किंवा दरवाज्यावर कावळा बसणं ही सामान्य बाब आहे. पण वास्तुशास्त्रात याबाबत काही गोष्टी अधोरेखित केल्या आहेत.
वास्तुशास्त्रानुसार, प्रवासावेळी कावळा ओरडत दारात आला तर प्रवास सुखकर होणार असल्याचे संकेत आहेत. तसेच जीवनात काही सकारात्मक बदल होणार आहेत.
सकाळी कावळा आणि उत्तर किंवा पूर्वी दिशेल उडत असेल, तर घरी पाहुणे येण्याचे संकेत आहेत. जवळच्या नातेवाईकांची भेट होऊ शकते.
इंटरव्यू किंवा शुभ कार्यासाठी बाहेर जात असताना पश्चिम दिशेने कावळा उडाला तर यशाचे संकेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील.
घराजवळ खूप सारे कावळे एकत्र आले आणि ओरडत असतील, तर सावध व्हा. कोणत्यातरी मोठ्या संकटाचे संकेत असतात.
दक्षिण दिशेला कावळा बसला असेल तर अशुभ मानलं जातं. पूर्वज नाराज असल्याचे संकेत आहेत. पितृदोष असू शकतो.
कावळ्याने भाकरी खाल्ली तर पूर्वज खूश असल्याचे संकेत आहेत. कावळ्याने तुमच्या दारात पाणी प्यायला तर शुभ संकेत आहे.