धार्मिक मान्यतेनुसार, पितरं नाराज असतील पितृदोष लागतो. पितृदोष असेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.
घरात अचानक पिंपळ वृक्ष उगवलं तर पितृदोष मानला जातो. यासठी पितरांची शांती करणं आवश्यक आहे.
पितृदोष असेल आणि तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागत असेल तर काही उपाय घरात करणं आवश्यक आहे.
पितृदोष दूर करण्यासाठी रोज संध्याकाळी घरातील दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे पितृदोष कमी होतो.
दुपारी पिंपळ वृक्षाला जल अर्पण करावं. तसेच पाण्यात काळे तीळ मिसळून दक्षिण दिशेला अर्घ्य द्यावं. यामुळे पितृदोषातून सुटका होते.
घरात दक्षिण दिशेला पितरांचा फोटो लावू शकता. त्या फोटोसमोर दिवा, धूप किंवा अगरबत्ता लावा. तसेच पितरांच्या स्मरणार्थ माळ जपावी. ओम पितृदेवाताभ्यो नम: या मंत्राचा जप करावा.
घरात पितृदोष असेल तर रोज घरात हनुमान चालीसा आणि गीता पठण करावं. कापूर जाळल्याने देवदोष आणि पितृदोष दूर होतो.
पितृदोष दूर करण्यासाठी कावळा, चिमण्या, गाय आणि कुत्र्यांना भाकरी द्या. तसेच माश्यांना अन्न टाका.