28 नोव्हेबर 2024

ब्रह्म मुहूर्तावर उठून सर्वात आधी काय केलं पाहीजे?

ब्रह्म मुहूर्त सर्वात पवित्र आणि शांत वेळ मानली जाते. यावेळेत केलेल्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावर होतो.

ब्रह्म मुहूर्ताच्या वेळ सूर्योदयाच्या आधी सुरु होतो. ब्रह्म मुहूर्ताची वेळ सकाळी 3.30 ते 5.30 दरम्यान असते. 

ब्रह्म मुहू्र्तावर प्रार्थना केल्याने मन शांत होतं. सकारात्मक ऊर्जेने सुरुवात होते. 

तुम्ही तुमच्या आराध्य देवाचा मंत्राचा जप करू शकता. यामुळे मन एकाग्र होते आणि आध्यात्मिक उर्जेची अनुभूती होते. 

हिंदू धर्मात तळाहाताचं दर्शन घेणं शुभ मानलं जातं. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती करमूले: तू गोविंदा: प्रभाते कर दर्शनम् या मंत्राचा जप करून हाताकडे पाहावं. 

ब्रह्म मुहूर्तावर उठून ध्यानसाधना केल्यास शरीरातील रक्तसंचार व्यवस्थित होतो. तसेच पाचनशक्ती सुधारते. मानसिक शांतता लाभते. 

शास्त्रानुसार, ब्रह्ममुहूर्तावर काहीही खाऊ नये. या उलट पूजा पाठ केल्यास लाभदायी ठरते.