26 नोव्हेबर 2024

आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी शिवलिंगावर शनिवारी काय अर्पण करावं?

महादेव हे शनिदेवांचेही गुरु आहेत. यासाठी शनिवार शिवलिंगावर काही गोष्टी अर्पण कराव्यात. यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळते.

ज्योतिषशास्त्रानुसार, शिवलिंगावर शनिवारी पाच वस्तू अर्पण करण्यास सांगितल्या आहेत.

काळ्या तिळाचा संबंध थेट शनिदेवांशी आहे. म्हणून शिवलिंगावर शनिवारी काळे तीळ अर्पण करावेत. यामुळे पितृदोष आणि शनिदोषापासून मुक्ती मिळते.

शमी वृक्ष हे शनिदेवांना समर्पित आहे. यामुळे शनिवारी शिवलिंगार शमीचे पानं अर्पण करावीत. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात. 

उडीदाच्या डाळीचा संबंधही शनिदेवासी आहे. शनिवारी शिवलिंगावर उडीदची डाळ अर्पण करावी.

गंगाजल खूपच पवित्र मानलं जातं. शनिवारी शिवलिंगावर गंगाजल अर्पण करावं. यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळते. 

दूध हे शुद्धतेचं प्रतिक आहे. त्यामुळे शनिवारी शिवलिंगावर दुधासोबत गूळ अर्पण करावं. यामुळे शनि आणि इतर ग्रहांचा अशुभ प्रभाव कमी होतो.