कन्या पूजनसाठी मुली मिळाल्या नाही तर काय करावं?

4 एप्रिल 2025

Created By:  राकेश ठाकुर

सनातन धर्मात नवरात्रीचं खास महत्त्व आहे. नवरात्रीच्या दरम्यान देवीच्या नऊरुपांची पूजा केली जाते. 

नवरात्रीचा व्रत केल्यानंतर कन्या पूजन केलं जातं. मान्यतेनुसार, कन्या पूजन केल्यानंतर व्रतपूर्ती होते असं बोललं जातं. 

अनेकदा कन्या पूजनासाठी मुली मिळत नाहीत. अशा स्थितीत काय करायचं ते जाणून घ्या. 

आसपास मुली नसतील तर मंदिरात जाऊन कन्या पूजन करावं. तसेच प्रसाद गरीब आणि गरजूंना वाटावा.

अनेकदा मुली शाळेत किंवा इतर ठिकाणी गेल्याने मिळत नाही. अशा स्थितीत त्यांच्या घरी जाऊन प्रसाद आणि दक्षिणा देऊ शकता. 

हिंदू धर्मात स्त्रीला देवीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे आई, पत्नी किंवा घरातील मुलींची पूजा करू शकता.