19 डिसेंबर 2024
घराच्या भिंतीवर पिंपळाचं झाड उगवलं तर काय करावं?
हिंदू धर्मात पिंपळ वृक्ष पवित्र मानला जातो. यात भगवान विष्णू आणि अन्य देवी देवतांचा वास असल्याचं सांगितलं जातं.
पिंपळ वृक्ष पक्षाच्या विष्ठेतून भितींवर उगवतं. तसेच तग धरून राहतं. मग ते काढायचं कसं हा प्रश्न पडतो.
वास्तुशास्त्रानुसार, पिंपळ वृक्ष घराच्या भिंतीवर असणं चांगलं मानलं जात नाही. यामुळे कौटुंबिक अडचणींना सामोरं जावं लागू शकतं.
दुसरं कारण म्हणजे, पिंपळ वृक्ष भिंतीवर उगवला तर वास्तु खराब होते. त्याची मूळं खोलवर रुततात आणि भिंतीला तडे जातात.
ज्योतिषशास्त्रानुसार, पिंपळ वृक्ष भिंतीवरून काढताना विधिपूर्वक पूजा करावी. तसेच 45 दिवस पूजा करावी आणि रोज जल अर्पण करावं.
ज्योतिषशास्त्रानुसार, पिंपळ वृक्ष काढण्यापूर्वी भगवान विष्णुंचा जप करावा आणि नमस्कार करावा.
पिंपळ वृक्ष रविवारी काढून दुसरीकडे लावणं शक्य असेल तर लावावं.