जुन्या मराठीमध्ये वारांची नावे काय होती? माहित आहे का? 

1 january 2024

Created By : Mahesh Pawar

हे सात वार कसे ठरविले त्याचा अनुक्रम कसा याची एक गंमत आहे.

सूर्य प्रदक्षिणेला सर्वात कमी वेळ घेणारा शनी, गुरू, मंगळ, रवी, शुक्र, बुध, चंद्र (सोम) असा क्रम घेतला.

यातील कोणत्याही वारापासून सुरुवात करून पुढचे दोन वार गाळून जो वार येईल तो त्या ग्रहाचा वार.

शनिवारनंतर दोन नावे गाळून जो येतो तो रविवार. याच क्रमाने सोमवार, मंगळवार वगैरे.

यातील पहिला वार रविवार याला जुन्या मराठीत आदित्यवार म्हणत.

दुसरा वार सोमवार याला चंद्रवार किंवा इंदुवार म्हणत

तिसरा वार  मंगळवार याला भौमवार म्हणत

चौथा वार बुधवार याला सौम्यवार म्हणत 

पाचवा वार गुरुवार याला बृहस्पतीवार म्हणत

सहावा वार शुक्रवार याला भृगुवार म्हणत

सातवा वार शनिवार याला मंदवार किंवा स्थिरवासर असे म्हणत.