11 जानेवारी 2025
अयोध्येत प्रभू रामांची आरती कधी आणि किती वेळा होते?
अयोध्येत प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर वर्षपूर्ती झाली आहे. तीन दिवसांचा उत्सव अयोध्येत साजरा केला जात आहे.
अयोध्येत दर्शनासाठी भाविकांची रिघ लागली आहे. चला जाणून घेऊयात प्रभू रामांची आरती दिवसात कधी आणि किती वेळा होते ते.
अयोध्येत प्रभू रामांची आरती दिवसातून सहा वेळा होते. प्रभू रामांचं दर्शन सकाळी सहा वाजल्यापासून सुरु होते. त्यानंतर मुख्य आरती होते.
सकाळी 3.30 ते 4 पर्यंत मंगला आरती, 5.30 वाजता श्रृंगार आरती, मुख्य आरती, दुपारी मध्यान्ह भोग आरती, संध्याकाळी संध्या आरती आणि रात्री शयन आरती होते.
प्रभू रामांची मुख्य आरती सकाळी 6.30 वाजता होते. या आरतीत सहभागी होण्यासाठी भक्तांना एक दिवस आधी बुकिंग करावं लागतं.
संध्या आरतीसाठीही बुकिंग दर्शनच्या दिवशीच करावी लागते. यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन पास व्यवस्था आहे.
पास असणारी व्यक्तीच प्रभू रामांच्या आरतीत सहभागी होऊ शकते. आरतीसाठी पास मोफत आहे.