प्रेमानंद महाराजांचे  गाव कोणते आहे ?

08 April 2025

Created By: अतुल कांबळे

Tv9-Marathi

वृंदावनचे संत  प्रेमानंद महाराज यांना सर्वच जण ओळखतात,त्यांचे भक्त जगभरात आहेत

  प्रेमानंद महाराज यांचे दर्शनासाठी भक्त आश्रमात येतात.त्यांचे गाव फारच कमी लोकांना माहीतीय

प्रेमानंद यांचा जन्म १९६९ मध्ये कानपूर जवळील सरसौल ब्लॉकच्या अखरी गावात झाला

 प्रेमानंद यांच्या आईचे नाव रमादेवी आणि वडिलांचे नाव शंभू पांडे आहे

अखरी गावात त्यांचे बालपण गेले. १३ वर्षांचे असताना त्यांनी अध्यात्मासाठी घर सोडले

 प्रेमानंद महाराज राधाराणी यांचे परमभक्त आहेत. असं म्हणतात त्यांना भोलेनाथाने स्वयंम दर्शन दिले होते.त्यानंतर ते घरसोडून वृंदावनला आले

लहानपणी प्रेमानंद महाराज यांचे नाव अनिरुद्ध कुमार पांडे होते

प्रेमानंद त्यांच्या साध्या स्वभावाने ओळखले जातात,अनेक नामीगिरामी हस्ती त्यांचे भक्त आहेत