28 नोव्हेबर 2024
तुळशीला जल अर्पण करताना कोणता मंत्र म्हणावा?
मान्यतेनुसार, तुळशीला हिंदू धर्मात देवीचं स्वरुप मानलं गेलं आहे. तुळशीला जल अर्पण केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते.
ब्रह्म मुहूर्त सर्वात पवित्र आणि शांत वेळ मानली जाते. यावेळेत केलेल्या गोष्टींचा प्रभाव आपल्या जीवनावर होतो.
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशी मातेची पूजा केल्याने घरातील वातावरण शुद्ध होतं. सकारात्मक उर्जेचा वास राहतो.
मान्यतेनुसार, तुळशीला जल अर्पण केल्याने आणि पूजा केल्याने मानवाला धार्मिक पुण्य प्राप्त होते.
तुळशीला जल अर्पण आणि पूजा करण्याची योग्य वेळ सकाळी असते. सूर्योदयानंतर तुळशीला जल अर्पण करणं शुभ मानलं जातं.
तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुपाचा दिवा लावला पाहीजे. यामुळे घरात देवी लक्ष्मीची कृपा राहते.
ज्योतिषशास्त्रानुसार, तुळशीला जल अर्पण करताना 'ओम सुभद्राय नम:' जप करावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा राहते.